नवी दिल्ली : कतार ऐअरवेजने लठ्ठपणामुळे (obesity) लठ्ठपणामुळे रोखला मॉडेलचा विमान प्रवास! ब्राझीलच्या एका मॉडेलला विमान प्रवास करण्यापासून रोखल्याची घटना आता उघड झाली आहे. जुलियाना नेहमे असे या महिलेचे नाव आहे. 22 नोव्हेंबरला बैरूत ते दोहा असा विमान प्रवास या महिलेला करायचा होता. मात्र, महिलेच्या लठ्ठपणामुळे कतार ऐअरवेजने तिला प्रवास करू दिला नाही.
सोशल मीडिया इनफ्लूयन्सर जुलियानाने (obesity) या धक्कादायक प्रकाराबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. या प्रकरणाबाबत ब्राझीलच्या न्यायाधीशांनी कतार ऐअरवेजला सुनावले आहे. महिलेच्या सायकोथेरापीच्या सेशन्ससाठी कतार ऐअरवेजने पैसे द्यावेत, असे आदेशही दिले आहेत.
जुलियानाने या प्रकरणाबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं, " मी इकॉनॉमी सीटसाठी दिलेल्या 947 डॉलर्सचा परतावा देण्यासही मला नकार देण्यात आला. तसेच मोठ्या सीटवर बसण्यासाठी फर्स्ट क्लास तिकीटसाठी 3 हजार डॉलर्स एवढे पैसे द्यावे लागतील, असेही मला सांगण्यात आले." झालेला सर्व प्रकार जुलियानाने इन्स्टाग्रामवर (obesity) व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे.
यावेळी जुलियाना व्हिडीओत बोलताना म्हणाली, "माझा प्रवास करण्याचा अधिकार (obesity) असतानाही त्यांनी मला नाकारले. मी लठ्ठ असल्यामुळे ते मला प्रवास करू देत नाहीत. घडलेला प्रकार खूप भयानक आहे. कतारसारखी कंपनी माणसांमध्ये भेदभाव करते, हे लज्जास्पद आहे. मी लठ्ठ आहे; पण अन्य बाबतीत मी इतरांसारखीच आहे.
हेही वाचा :