Pornography Case : पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला जामीन मंजूर

 राज कुंद्रा
राज कुंद्रा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : Pornography Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला आहे. न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला.

महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज (दि. २०) राज कुंद्राला जामीन मंजूर केला. राज कुंद्रा यांना १९ जुलैला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पॉर्न प्रकरणात त्यांच नाव आल्यानंतर गहना वसिष्ठ, शर्लिन चोप्रा यांनीही त्याच्यावर काही आरोप केले होते.

पॉर्नोग्राफी प्रकरणात बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात राहिलेले उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचे पती राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते एका अर्जाद्वारे प्रदर्शित करणे यासारखे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. मात्र आज, राज कुंद्राचा ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई न्यायालयाने राज कुंद्राला हा जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्रा २०२१ पॉर्न फिल्म प्रकरणात कथित सहभागासाठी न्यायालयीन कोठडीत होता. राज कुंद्राला ५० हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मिळाला आहे. कुंद्रा यांच्यासह त्यांच्या कंपनीचे आयटी प्रमुख रायन थॉर्पलाही जामीन मंजूर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या दोघांचीही आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यात येणार आहे.

राज कुंद्रा यांचे पोर्नोग्राफी प्रकरण काय आहे?

अश्लिल फिल्म बनविणे आणि त्यांचे काही अ‍ॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी १९ जुलै रोजी अटक केली होती. मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघडकीस आणले होते.

या कारवाईत यापूर्वी यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (40), प्रतिभा नलावडे (33), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (32), मोनू गोपालदास जोशी (26), भानुसूर्यम ठाकुर (26), वंदना रविंद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (32), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (38) यांना बेड्या ठोकल्या होत्या.

रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉटहीट वेबसाइट तयार केली होती. यात दीपंकर हा सहसंचालक आहे. त्यांनी यावरून अनेक पॉर्न व्हिडीओ शेअर केले आहेत. तर दुसरीकडे गहनाने परदेशस्थित कंपनीला विविध अश्लील फ़िल्म पाठवून लाखोंची कमाई केली. यात तिचे भारतातील काम पाहणारा उमेश कामत पथकाच्या हाती लागला. तो उद्योजक राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे.

कामच्याच्या अटकेनंतर कुंद्रा तपास यंत्रणाच्या रडारवर आला. त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती १९ जुलैच्या रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news