नाणेतील रस्त्यांसाठीचा कोट्यवधींचा निधी खड्ड्यात | पुढारी

नाणेतील रस्त्यांसाठीचा कोट्यवधींचा निधी खड्ड्यात

कामशेत : मावळ तालुक्यात नाणे मावळ परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामध्ये वडिवळे ते सांगिसे, कामशेत ते नाणे, साई, वाउंड, उकसान, उंबरवाडी, करंजगाव इत्यादी गावांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले दिसत आहेत. त्यामुळे या परिसरात रस्त्यांच्या कामासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी खड्ड्यात गेल्याचे दिसत आहे. नाणे मावळ हा मावळ तालुक्यातील मोठा भाग मानला जातो. सुमारे 60 ते 70 गावे आणि वाड्या-वस्त्या मिळून नाणे मावळ परिसर मानला जातो.

शिवाय शेती व्यवसायाबरोबरच कुक्कुटपालन व्यवसाय शेतकरी करतात. नाणे मावळ हा पर्यटकांसाठी आकर्षण करणारा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात कोंडेश्वर, शिरोदा डॅम, उकसान जवळील निसर्गरम्य परिसर अशा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांची दररोज वर्दळ असते.

चालकांची कसरत

या रस्त्यातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, काही रस्ते पंचायत समिती बांधकाम विभागाकडे असतात. पण सद्यस्थितीत दोन्ही विभागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या कामासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. हा निधी वर्षातच खड्ड्यात जात असल्याचे दिसत आहे. अशा रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. जीव मुठीत धरून चालकांना वाहन चालवावे लागत आहे.

Back to top button