दीपिकाचा बोल्ड अवतार | पुढारी

दीपिकाचा बोल्ड अवतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सुमारे चार वर्षांनंतर शाहरुख कमबॅक करत आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अशात आता या चित्रपटातील पहिले गाणं प्रदर्शित झाले असून या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. शाहरुख आणि दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचे पहिले गाणे ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झाले आहे. यामध्ये एकीकडे शाहरुखचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दीपिका बोल्ड अवतारात दिसत आहे. याआधी दीपिकाचा या गाण्यातील बिकिनी लूकही चर्चेत आला होता. गाण्याच्या सुरुवातीला दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. ‘हमें तो लूट लिया मिलके इश्क वालों ने’ अशा गाण्याच्या ओळी आहेत.

Back to top button