Vicky- Katrina Wedding Anniversary : ‘तू कल्पनाही करू शकत नाहीस इतकं प्रेम…’

Vicky- Katrina Wedding Anniversary
Vicky- Katrina Wedding Anniversary
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल याच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष उलटले आहेत. गेल्या वर्षाच्या ९ डिसेंबर रोजी कॅट – विक्कीचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात विवाह बंधनात अडकले होते. याआधी ७ आणि ८ तारखेला मेंहदी आणि साखरपुड्याचा कार्यक्रम एखाद्या संभारभांप्रमाणे पार पडला. यानंतर या कपलने सुखी जीवनातील अनेक रोमॉन्टिक फोटो शेअर केले होते. आता त्याच्या लग्नाला एक वर्ष झाल्याने दोघांनी रोमॉन्टिक फोटो शेअर करत एकमेकांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. ( Vicky- Katrina Wedding Anniversary )

कॅटरिना कैफ आणि विक्की कौशलने दोघांच्या इंन्स्टाग्रामवर काही लग्नातील जुने आणि सोबत नवे फोटो शेअर केले आहेत. यात ती लग्नातील वेडिंग लूकमध्ये हटके दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कॅटरिनाने लिहिलेय की, 'My Ray of Light Happy One Year ……..❤️'. तर विक्कीने शेअर केलेल्या फोटोत कॅटरिनाला शुभेच्छा देताना लिहिलंय की, 'Time flies… but it flies in the most magical way with you my love. Happy one year of marriage to us. I love you more than you can ever imagine! ❤️??'. त्यामुळे कॅट आणि विक्की लग्नाच्या एक वर्षानंतर दोघेही हॅपी मॅरेज लाईफ एन्जॉय करताना दिसत आहे.

यातील एका व्हिडिओत विक्की आनंदाने डान्स करताना तर कॅटरिना विक्कीसोबत रोमॉन्टिक मूडमध्ये दिसतेय. यावरून दोघांनी लग्नाचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करताना दिसले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव करताना शुभेच्छा दिल्या आहेत. (Vicky- Katrina Wedding Anniversary)

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news