‘ट्विटर वर तक्रार करू नका’, लोकसभा अध्यक्ष ओम बिरलांची खासदारांना चेतावणी | पुढारी

'ट्विटर वर तक्रार करू नका', लोकसभा अध्यक्ष ओम बिरलांची खासदारांना चेतावणी

पुढारी ऑनलाइन डेस्क : आम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला गेला नाही, अशी तक्रार ट्विटर वर करू नका अशी चेतावणी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी खासदारांना दिली आहे. ओम बिरला यांनी गुरुवारी मायक्रो-ब्लॉगिंग बेबसाइट ट्विटर वर स्पीकर विरोधात केलेल्या टिप्पणीनंतर ही चेतावणी दिली आहे.

बिरला म्हणाले की काही खासदार स्पीकर ने त्यांना बोलण्यासाठी वेळ दिला नाही, अशी तक्रार ट्विटर वरून करतात. पण हे योग्य नाही. मी प्रत्येक सदस्याला बोलण्यासाठी वेळ देत असतो. त्यामुळे मी तुम्हाला आग्रह करतो की ट्विटरवरून अशी तक्रार करू नका, ते चांगले राहणार नसेल…

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना ओम बिर्ला यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या महुआ मोईत्रा यांनी काही क्षणांपूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संबंधित एक मुद्दा उपस्थित केला तेव्हा ही टिप्पणी केली.

हे ही वाचा :

जुन्या इमारतीतच होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन, मल्टिस्टेट, डेंटल कमिशनसह 16 विधेयके सादर करणार…

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार

Back to top button