

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा किंग शाहरुख खान हा त्याच्या नवीन चित्रपट 'पठाण'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचा नवा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनीही शाहरुखच्या 'पठाण'मधील भूमिकेबद्दल चर्चा केली.
किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान (Pathaan Look) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच या चित्रपटातून शाहरुख खानचा नवा लूक समोर आला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख या चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. (Pathaan Look)
अलीकडेच या चित्रपटातील शाहरुखच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना 'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाले की, सुपरस्टारचा लूक खूपच मस्त आहे, जो लोकांना आधीच आवडला आहे. 'पठाण'मध्ये शाहरुख एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. ते पुढे म्हणाले की, आमच्यासाठी पठाणमधील शाहरुख खानचा लूक हे एक मोठे आव्हान होते. कारण आम्हाला अशी व्यक्तिरेखा कॅप्चर करायची होती जी शाहरुखला त्याच्या केसांच्या स्टाईल आणि लूकसह मस्त लुक देईल. आम्हाला त्याला कूल आणि हॉट असा लूक द्यायचा होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट ठरणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. किंग खानचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीपासून प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहता येणार आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, जो लोकांना खूप आवडला. 'पठाण' व्यतिरिक्त शाहरुख 'जवान' आणि 'डंकी' यासारख्या चित्रपटातही दिसणार आहे.
हेही वाचा :