बिग बॉस मराठी 4 : राखी करते आहे प्रसादसोबत फ्लर्ट | पुढारी

बिग बॉस मराठी 4 : राखी करते आहे प्रसादसोबत फ्लर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करत असते. आज घरात राखी प्रसादसोबत flirt करताना दिसणार आहे. राखी बोलता बोलता प्रसादकडे गेली आणि… प्रसादने राखीची माफी मागितली. प्रसाद म्हणाला, माझी आई… राखी मी तुझ्या पाया पडतो… मला माफ कर. त्यावर अमृता देशमुख म्हणाली, काय प्रसाद कसला बोर आहेस तू… राखी प्रसादला म्हणाली, काय झालं तुझ्या हृदयात? धकधक करने लगा क्या? प्रसाद म्हणाला, आज दहन करणारच आहे मी … अमृता देशमुख म्हणाली, कितना अच्छा मौका था यार.

Back to top button