महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून बिरवाडी, पारूट मंदिरातील चोरीच्या घटनांनंतर मुंबई पॉईंट येथे दोनच दिवसांपूर्वी तीन दुकानामध्ये चोरी झाली होती. आता मेटतळे व गव्हर्नर बांगला राजभवन या परिसरातून दोन मोटारसायकलची चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलिस ठाण्यात ऋषिकेश दौलत चौधरी यांची होंडा सीबी शाईन (एम एच ०२ डिसी ५७०३) ही मोटारसायकल मेटतळे येथील ओंकार ढाबा परिसरातून तर विवेक रमेश शिंदे यांची स्प्लेंडर प्लस (एमएच १२ यूबी २०६४) मोटारसायकल गव्हर्नर बांगला राजभवन परिसरातून अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार दाखल आहे. महाबळेश्वर तालुक्यातील चोऱ्यांचे प्रमाण रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.