Zubin Nautiyal : पायऱ्यांवरून पडल्याने गायक जुबिन नौटियाल जखमी | पुढारी

Zubin Nautiyal : पायऱ्यांवरून पडल्याने गायक जुबिन नौटियाल जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध पार्श्वगायक जुबिन नौटियालचा गुरुवारी सकाळी अपघात झाला. त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पायऱ्यांवरून पडल्यानंतर गायकाच्या (Zubin Nautiyal) हाताला दुखापत झाली. त्याच्या डोक्यालाही जखम झाल्याचे समजते. अपघातानंतर गुरुवारी रात्री जुबिन नौटियालच्या उजव्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अलीकडे, त्याची तू सामना आये, माणिके आणि इतर अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. रात लांबिया, लूट गए, हमवा मेरे आणि तुझे कितना चाहने लगे हम, तुम ही आना, बेवफा तेरा मासूम चेहरा या गाण्यांना त्याने स्वरसाज चढविला आहे. (Zubin Nautiyal)

डॉक्टरांनी जुबिनला उजव्या हाताची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जुबिनने गेल्या आठवड्यातच दुबईमध्ये एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले होते. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, ‘दुबईतील लोकांसमोर परफॉर्म करणे हा एक वेगळा अनुभव आहे. मी येथे परफॉर्म करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो आणि माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहीन. उत्सवांचा हंगाम काही दिवसांत सुरू होणार आहे आणि मला उत्सव सुरू करण्यासाठी संगीतापेक्षा चांगले काहीही वाटत नाही.

त्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते- ज्या गाण्यांवर पुन्हा काम करायचे आहे, अशी अनेक गाणी आहेत, जी मला संगीतबद्ध करायची आहेत. बडी दूर से आये है प्यार का तोहफा लाये है हे देखील एक गाणे आहे, जे मला त्याचे बोल फार आवडल्यामुळे संगीतबद्ध करायला आवडेल. मी लहान असताना ये जीवन है हे गाणे गायले होते. तेव्हा या गाण्याचा संगीतकार कोण आहे आणि संगीताची प्रक्रिया काय आहे हेही मला कळत नव्हते.

संबंधित बातम्या

Back to top button