पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पत्रकार संघात हुल्लडबाजी | पुढारी

पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पत्रकार संघात हुल्लडबाजी

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये आज अर्बन फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्यामार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी आ. बच्चू कडू, आ. गोपीचंद पडळकर,आ. सदाभाऊ खोत असे अनेक नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले असून पत्रकार भवन मध्ये विद्यार्थ्यांनी तुडुंब गर्दी केली आहे.

या गर्दीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की, हुल्लडबाजी करत अशांतता निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांना कार्यक्रमात जाऊ न दिल्यामुळे पत्रकार भवन परिसरात तसेच रस्त्यावरच विद्यार्थ्यांनी आरडाओरड, शिट्या वाजवत हुल्लडबाजी करायला सुरुवात केली आहे. आमदार सदाभाऊ खोत पत्रकार भवन मध्ये जात असताना सदाभाऊ अशा एकेरी आवाजात त्यांची खिल्ली विध्यार्थ्यानी उडवली आहे.

 

Back to top button