वयाच्या चाळीशीतही सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब | पुढारी

वयाच्या चाळीशीतही सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाढत्या वयासोबत सौंदर्यही खुलत गेलेली अभिनेत्री म्हणजे मोनालिसा. या भोजपुरी अभिनेत्रीचे नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या नायिकांमध्ये घेतले जाते. तिचा खुमासदार अभिनय आणि सौंदर्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिने अनेक भोजपुरी हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे तिची वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही. सोशल मीडियावर तिचे पन्नास लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या अभिनेत्रीचे खरे नाव आहे अंतरा बिस्वास. तथापि, हे नाव उच्चारायला जरा कठीण जात असल्यामुळे मोनालिसा असे आटोपशीर नाव तिने धारण केले आहे. 2016 मध्ये ती बिग बॉस या गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. हिंदी, बंगाली, तामिळ, कन्नड आणि तेलगू चित्रपटातही ती झळकली आहे.

Back to top button