सैफ अली खान आणि करीना कपूर ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत. अनेकदा तैमूर पापाराझींच्या कॅमेर्यात कैद होत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने त्याच्या मुलांबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, माझ्या मुलांकडे स्वत:ची वेगळी क्षमता व सामर्थ्य आहे. तैमूर आता जंकफूड खात नाही. त्याला फळे खाण्यास दिली की जंकफूड किती वाईट आहे, हे तो सांगतो. तैमूर व मी गिटार शिकत असल्याचदेखील त्याने सांगितले. सारा खान, इब—ाहिम व तैमूरकडून त्याला खूप काही शिकायला मिळाले असून सारा ही अत्यंत नम— व कुठलाही गर्व नसणारी मुलगी आहे. तिला कोणाचेही मन दुखवायला आवडत नाही. ती अत्यंत शांतपणे संपूर्ण परिस्थिती हाताळते. इब—ाहिम कधीच कोणत्याच गोष्टीचा ताण घेत नाही.