हाेय मी त्‍याच्या कानशिलात लावली : नोरा फतेही | पुढारी

हाेय मी त्‍याच्या कानशिलात लावली : नोरा फतेही

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ‘द कपिल शमा’ या शोमध्ये अभिनेत्री-डान्सर नोरा फतेहीने हजेरी लावली होती. यावेळी नोराने धमाल-मस्ती केली. नोराने यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने यावेळी सहकलाकाराबाबत सांगितलेला किस्सा धक्कादायक होता.

नोरा फतेहीचा ‘ॲन ॲक्शन हीरो’ हा आगामी सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नोरा, आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावतने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कपिल शर्माला नोराला खूप फ्लर्ट करताना दिसली.

कपिल शर्माने नोराच्या सौंदर्यांचे खुप कौतुक केले. त्यावेळी नोरा म्हणाली, मी आजवर पाणी-पुरी खाल्लेली नाही. या दरम्यान तिचा सहकलाकारासोबतचा वाद मारामारीपर्यंत पोहोचल्याचा खुलासा या कार्यक्रमात केला.

नोराहाने घडलेला किस्सा सांगितला

कपिलने नोराला एक प्रश्न विचारला. चित्रीकरणादरम्यान कधी कोणाशी तुझे भांडण झाले होते का? यावर नोराने एक किस्सा सांगितला. तिचा हा किस्सा ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. नोरा म्हणाली, बांगलादेशमध्ये मी चित्रीकरण करत होते. चित्रीकरण करत असताना माझ्या सह-कलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केले. मी कोणताच विचार न करता त्याच्या कानशिलात लगावली. मी त्याला कानशिलात लगावल्यानंतर त्यानेही मला कानशिलात लगावली. मग मीही त्याला पुन्हा कानाखाली मारली. त्यानंतर तो माझे केस खेचू लागला. त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाला या वादामध्ये हस्तक्षेप करावा लागला. नोराचा हा किस्सा ऐकून उपस्थितांनाही धक्का बसला.

नोरा फतेही अभिनेत्री असली तरी एक उत्तम मॉडेल व नृत्यांगना आहे. तिने ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘दिलबर’ या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली.

२ डिसेंबर २०२२ रोजी ॲक्शन हिरो चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनिरुद्ध अय्यर दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना, जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहेत. ॲक्शन ड्रामाच्या थीमवर बनलेला हा चित्रपट ३० वर्षांचा असलेल्या एका नायकाची कथा आहे. अनिरुद्ध अय्यर यांनी ‘ॲन ॲक्शन हीरो’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा …

Back to top button