Akshay Kumar : ‘हेरा फेरी ३’ नाकारल्यावर निर्मात्यांनी केली अक्षय कुमारची ‘या’ चित्रपटातून गच्छंती | पुढारी

Akshay Kumar : ‘हेरा फेरी ३’ नाकारल्यावर निर्मात्यांनी केली अक्षय कुमारची ‘या’ चित्रपटातून गच्छंती

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नुकतेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) हेरा फेरी ३ या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. यावेळी नकार देताना त्याने चित्रपटाची कथा आणि पटकथा आवडली नसल्याचे कारण दिले होते. आता हेरा फेरी ३ चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांनी अक्षय कुमार याची तीन चित्रपटातूनच उचल बांगडी केली आहे. त्यामुळे हेरा फेरी ३ हा चित्रपट सोडणे अक्षय कुमारला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

नुकतेच अक्षय कुमार (Akshay Kumar) याने मतभेदांमुळे ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागात काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर या कल्ट चित्रपटात अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या अफवांना पूर्णविराम देत अक्षयने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, ‘त्याला स्क्रिप्ट आवडली नाही, म्हणून त्याने चित्रपट करण्यास नकार दिला.’ आता इतकं झाल्यावर निर्मात्यांनीसुद्धा हा मुद्दा जिव्हारी लावून घेतला आणि त्यांनी ‘आवारा पागल दीवाना 2’ आणि ‘वेलकम 3’… या दोन्ही चित्रपटाच्या सिक्वेलमधून अक्षय कुमारला बाहेर काढले.

आता समोर येत असलेल्या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की अक्षय कुमारच्या (Akshay Kumar)या वक्तव्यामुळे फिरोज नाडियादवाला खूपच नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी या अभिनेत्याशिवाय ‘आवारा पागल दीवाना 2’ आणि ‘वेलकम 3’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, फिरोज नाडियाडवाला अक्षय कुमारवर नाराज आहेत. ‘स्क्रिप्ट खराब आहे’ या अक्षय कुमारच्या वक्तव्याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परिणाम होऊ शकतो आणि याची जाणीव असूनही अक्षयने असे वक्तव्य जाहीरपणे केले आहे, असे त्यांचे मत आहे.

यासंदर्भात असे सुद्धा माहिती समोर येत आहे की, अक्षय कुमारच्या जास्त फीमुळे निर्मात्यांना कार्तिक आर्यनला साईन करावे लागले. खरंतर अक्षय कुमार ‘हेरा फेरी 3’साठी जवळपास 90 कोटी रुपये फी मागत होता. पण, निर्मात्यांना चित्रपटाच्या बजेटमधील एवढी मोठी रक्कम स्टार्सच्या फीमध्ये खर्च करायची नव्हती, म्हणून त्यांनी अभिनेत्याला फी कमी करण्याची विनंती केली. मात्र, अक्षयवर विश्वास ठेवू नका. त्यानंतर निर्मात्यांनी कार्तिक आर्यनला साईन केले. या चित्रपटासाठी कार्तिकने 30 कोटी रुपये घेण्याचे मान्य केले आहे.

अधिक वाचा :

Back to top button