हृतिक रोशनचा नवा आशियाना; गर्लफ्रेंड सबासोबत राहणार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये?

Saba Azad हृतिक रोशन
Saba Azad हृतिक रोशन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवू़ड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद गेल्या काही दिवसांपासून एकमेंकाना डेट करत असल्याची चर्चा पसरली आहे. कधी दोघेजण डिनर डेट तर कधी डेट नाईट पार्टीत स्पॉट झाले आहेत. तर निर्माते करण जोहरच्या ५० व्या बर्थडे पार्टीत एकमेंकांच्या हातात-हात घालून फिरताना दिसते. मध्यंतरी तर दोघांनी लंडनची वारीदेखील केली होती. यानंतर आता हृतिकने गर्लफ्रेंड सबासाठी मोठा आणि आलिशान फ्लॅट खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे. या फ्लॅटमध्ये हृतिक -गर्लफ्रेंड सबा जोडीने लवकरच गृहप्रवेश करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन आणि सबा आझाद काही काळापासून एकत्र राहण्याचा विचार करत आहेत. यासाठी हृतिकने मुंबईतील मन्नत अपार्टमेंट १०० कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. या अपार्टमेंटमधील इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांचे सध्या नूतनीकरण केले जात आहे. हे जोडपे लवकरच या घरामध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळतेय.

काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबासाठी मुंबईतील मन्नत अपार्टमेंटसाठी जवळपास १०० कोटी रुपये खर्च करून फ्लॅट घेतला आहे. हे अपार्टमेंट तीन मजल्याचे असून यापैकी दोन वरच्या मजल्याच्या नुतनीकरणासाठी हृतिकने ९७. ५० कोटी रूपयांचा खर्च केला आहे. हे अपार्टमेंट जुहू-वर्सोवा लिंक रोडवर आहे. अपार्टमेंटमधून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. हे अपार्टमेंट ३८ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तर हृतिक रोशन बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबतच्या आगामी 'फायटर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दोघांची ऑनस्क्रिन जोडी पहिल्यांदाच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हृतिक रोशनचे पहिले लग्न सुजैन खानशी झाले होते. काही वर्षांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर सुजैन खान अर्सलान गोनीला डेट करत आहे. तर हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news