Yusuf Shah : ब्रिटनच्या ११ वर्षीय युसूफने रचला इतिहास; IQ मध्ये आईनस्टाईनलाही टाकले मागे

Yusuf Shah : ब्रिटनच्या ११ वर्षीय युसूफने रचला इतिहास; IQ मध्ये आईनस्टाईनलाही टाकले मागे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : ब्रिटनमधील युसूफ शाह ११ वर्षीय मुलाने इतिहास रचला आहे. त्‍याने  मेन्सा आईक्यू टेस्टमध्ये १६२ बुद्ध्यांक प्राप्त करत जगभरात बुद्धिवान मानल्या जाणाऱ्या अल्बर्ट आइनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंगला देखील मागे टाकले आहे. अल्बर्ट आइनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग जगविख्यात बुद्धिमान व्यक्तींचा बुद्ध्यांक हा १६० च्या जवळपास असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. ११ वर्षीय युसूफचा यांच्यापेक्षाही जास्त म्हणजे १६२ बुद्ध्यांक असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ( Yusuf Shah )

रिपोर्टनुसार, युसूफ शाह हा ब्रिटनमधील विगटन मूर प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे. युसूफच्या पालकांनी हायस्कूलची तयारी करत असतानाच, मेन्सा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. या दोन्हीचा अभ्यासक्रम सारखाच असल्याने त्याने या परीक्षेची देखील तयारी केली. याप्रसंगावर बोलताना युसूफचे वडील इरफान शाह यांनी तयारी करण्यासाठी ही खूप कठीण परीक्षा असल्याचे म्हटले आहे. यासाठी आम्ही काही वेगळे केले नाही. आम्ही जे पहिल्यापासून करत होतं तेच केले.

Yusuf Shah : तीन मिनिटांत १५ प्रश्नांची उत्तरे

मेन्सा या चाचणीत युसूफला तीन मिनिटांत १५ प्रश्नांची उत्तरे द्यायची होती; पण युसूफने ३ मिनिटात १५ प्रश्नांची उत्तरे देत आपल्या नावावर हा ऐतिहासिक विक्रम नोंदवला. या परीक्षेत यश मिळवत युसूफने स्वत:ची बुद्धीमत्ता सिद्ध केली आहे. त्याने दिलेल्या मेन्सा परीक्षेच्या माध्यमातून त्याचा बुद्ध्यांक सर्वाधिक १६२ असल्याचे दिसून आले आहे. युसूफचा बुद्ध्यांक हाअल्बर्ट आइनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्‍या पेक्षाही अधिक असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

युसूफ गणितात वेगवान

युसूफच्या वडिलांनी सांगितले की,  त्याने लहानपणापासूनच प्रतिभा दाखवली आहे. युसूफ पाळणाघरात होता तेव्हाच आमच्या लक्षात आले होते की, तो इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. इतर मुलांच्या तुलनेत अक्षरे आणि गोष्टी तो लवकर करत असतो आणि गणितात देखील त्याचा वेग हा खूप असल्याचे युसूफच्या वडिलांनी सांगितले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news