Shubman Gill Dating Sara Ali Khan : शुभमन गिल सारा अली खानला करतोय डेट? खेळाडूने दिली कबुली…

Shubman Gill Dating Sara Ali Khan : शुभमन गिल सारा अली खानला करतोय डेट? खेळाडूने दिली कबुली…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काहीही म्हणा आपल्याकडे क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नाते खूप जुने आहे. खेळ आणि मनोरंजन ही दोन वेगवेगळे जग नेहमी एकत्र आल्याचे अनेकवेळा पाहिले गेले आहे. त्यातही क्रिकेट खेळाडू आणि बालिवूड अभिनेत्री यांचे अनेक प्रेमसंबध या गोष्टीवर शिक्का मोर्तुब करतात. नवाब पतौडी आणि शर्मिला टागोर पासून ते आता विराट आणि अनुष्का पर्यंतचा इतिहास हेच सांगतो. अनेक अभिनेत्रींनी आपला जीवन साथी म्हणून क्रिकेटरची निवड केली आहे. आता कदाचित एक पुढचा अध्याय या इतिहासांच्या पानात जोडला जाणार असेल. चर्चा तर काहीशी अशीच रंगत आहे. (Shubman Gill Dating Sara Ali Khan)

भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आणि अर्थात शर्मिला टागोर यांची नात आणि सैफ अली खान व अमृता सिंग यांची कन्या अभिनेत्री सारा अली खान यांच्या प्रेमसंबधांच्या चर्चांना हळू हळू का होईना उधाण येत आहे. बॉलिवूडमधील अफवा जर ऐकल्या ज्यांना लोक खरे मानत आहेत. त्यानुसार सारा आणि शुभमन हे एक मेकांना डेट करत आहे. या विषयी थेट शुमन गील याला विचारण्यात आले असता त्याने या गोष्टी स्पष्टपणे इन्कार देखिल केलेला नाही. त्यामुळे त्याच्या उत्तरातच सर्व गोष्टी आल्या असे लोक म्हणत आहेत. (Shubman Gill Dating Sara Ali Khan)

सोनम बाजवा यांचा टॉक शो 'दिल दियाँ गल्ला' मध्ये आलेल्या शुभमन गिल याने त्याच्या आणि सारा अली यांच्यातील डेटिंग रुमर्स घेऊन असे काही सांगितले की, ऐकणारे अवाक झाले. जेव्हा शुभमन गील याला विचारण्यात आली की, बॉलिवूडमध्ये सर्वात फिट असणारी अभिनेत्री कोण आहे. तर शुभमनने उत्तर दिले सारा अली खान. यानंतर त्याला थेट विचारण्यात आले की तू साराला डेट करतोस का ? तर शुभमन गील म्हणाला असू शकतं. यानंतर सोनम बाजवा यांनी विचारलं 'खरं खरं सांग', यावर शुभमन म्हणाला,'कदाचीत असं असू शकतं किंवा नाही सुद्धा'. (Shubman Gill Dating Sara Ali Khan)

सारा तेंडूलकर सोबत सुद्धा जोडले गेलं शुभमनचं नाव (Shubman Gill Dating Sara Ali Khan)

सारा अली खान आणि शुभमन गिल हे दोघे एकत्र काही महिन्यांपूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते आणि त्यांच्या एका छायाचित्राने डेटिंगच्या अफवांना उधाण आले होते. यापूर्वी अशी अफवा पसरली होती की शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिला डेट करत आहे.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचं काय झालं ?

दरम्यान, या पुर्वी सारा अली खान हिचे नाव अभिनेता कार्तिक आर्यनशी जोडलं गेलं होतं. ते दोघे एकमेकांना डेट करतात अशी चर्चा रंगली होती. करण जोहर यांच्या कॉफी विथ करण या शोमध्ये साराने कार्तिक आर्यन हा माझा क्रश असल्याचे सांगितले होते. या नंतर दोघांच्या डेटच्या चर्चा रंगल्या, पुढे जाऊन याच कार्यक्रमात करण जोहरने सैफ अली खान याला सारा आणि कार्तिक आर्यन यांच्या बद्दल विचारलं होतं. तेव्हा सैफ अली खान याने करण सांगितले होते की, माझ्या मुलीसाठी कोणालाही खूप सारे पैसे कमावावे लागतील मग त्याचा विचार करता येईल असे तो म्हणाला होता. यानंतर दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'लव आज कल' या चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिय आर्यन एकत्र दिसले होते.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news