बिग बॉस मराठी सिझन चौथा : तेजस्विनी विचारणार प्रसादला जाब!; ‘तू देखील…’ | पुढारी

बिग बॉस मराठी सिझन चौथा : तेजस्विनी विचारणार प्रसादला जाब!; 'तू देखील...'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम B मध्ये एकमेकांतच भांडणं असल्याचे दिसून येते. किरण माने आणि प्रसादचे अजिबात पटत नाही हे आपल्या सगळ्यांनाच आता कळून चुकले आहे. आज तेजस्विनी प्रसादला जाब विचारताना दिसणार आहे.

तेजस्विनीचे म्हणणे आहे की, आमच्या विरुध्द्व असताना कसे तू व्यवस्थित मुद्दे मांडतोस ? confusion ची पुडी जर एक माणसाने दिली असेल ना ती कॅरीफॉरवर्ड ज्या लोकांनी केली आहे ना, तू आज त्यांच्याशीच बोलतो आहेस. प्रसादचे म्हणणे आहे की, तुझ्या मते त्यांनी केलं? तेजस्विनी म्हणाली, मी experience केलं आहे. यावर प्रसाद म्हणाला की, तू experience केलं ना. पण तू त्याला तितकाच दुजोरा देखील दिला आहेस, हे मी experience केलं आहे.

सुरुवातीपासून जेव्हा मी म्हणत होतो जेव्हा अमृता तिकडे जात होती, योगेश होता, ही सगळी चर्चा चालू असताना मी बोलले कि, नाही कित्येकवेळा तेजू ऐक तिला जायचं आहे त्याच्याबद्दल वाद नाही. मी जर बोलतो आहे त्याच्याबद्दल वाद नका ठेऊ. कारण नसताना या छोट्या- छोट्या गोष्टींचं झाड होणार मोठं जे झालेलं आहे. यापुढे काय नक्की काय होणार यां बद्दलची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहेचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button