Rocky Aur Rani : आलिया- रणवीरच्‍या चित्रपटाची डेट ठरली; सलमानला भिडणार

Rocky Aur Rani Ki Prem Kahani
Rocky Aur Rani Ki Prem Kahani

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे निर्माते करण जोहर यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. यानंतर आलिया- रणवीर बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाला भिडणार आहे. कारण, सलमानच्या या चित्रपटाची रिलीज डेट त्याचवेळी आहे.

करण जोहरने यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. 'सात वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपट घेवून आलो आहे. माझ्या कार्यकाळात एकापेक्षा एक चांगल्या कलाकारांसोबत काम करण्याची मला संधी मिळालीय. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची कथा वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी-परंपरांच्या मुळाशी आधारित आहे. या चित्रपटाचे संगीत उत्तमरित्या आहे. प्रतीक्षा संपली आहे. रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी पुढच्या वर्षी म्हणजे, २८ एप्रिलला चाहत्यांच्या भेटीला येत आहे.'

या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या करण्यात आली आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीरसोबत धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित आहे.

आलिया-रणवीर सलमानला भिडणार

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपटदेखील पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट २२ एप्रिल असल्याची माहिती चित्रपट निर्मात्यानी आधीच दिली आहे. आता आलिया- रणवीरच्या चित्रपटदेखील २८ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर येणार असल्याने दोघांची टक्कर होणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news