Shahrukh Khan
Latest
शाहरुखच्या बॉडीगार्डला विमानतळावर रोखलं, भरावी लागली ५ लाखांची कस्टम ड्युटी
पुढारी ऑनलाईन डेस्क : दुबईतून परतलेला शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी घराकडे परतत होते. मागून त्याचे बॉडीगार्ड साहित्य घेऊन येत होते. तेव्हा मुंबई विमानतळार चेकिंगसाठी थांबवण्यात आले. दुपारी जवळपास १२ वाजता हा प्रसंग घडला, जेव्हा मुंबई कस्टमच्या एआययूब ऑफीशियल्सने ड्युटी अधिकाऱ्यांनी त्यांना गेट नंबर ८ वर रोखलं. त्यांचं म्हणणं होतं की, बॉडीगार्डकडे अनेक रिकामे डब्बे मिळाले, ज्यामध्ये लक्झरी वॉच ठेवली जातात. पण, त्या डब्यांमध्ये घड्याळे नव्हती.
एक आयवॉच सीरीज ८ चा रिकामा डबादेखील होता. रिपोर्ट्सनुसार, बॉडीगार्डचं नाव रवी सिंह आहे. पहाटे ५ वाजता दंड म्हणून ५ लाख रुपये भरल्यानंतर त्याला सोडून देण्य़ात आलं.
मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्ड रवी सिंह यांच्यासोबत शाहरुखचं खूप क्लोज बॉन्डिंग आहे.

