

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिपाशा बासूच्या घरी पाळणा हलला आहे. तिच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी बिपाशाने नन्ही परीला जन्म दिलाय. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर आता बॉलीवूडच्या या लव्हिंग कपलचा समावेश पॅरेंट क्लबमध्ये झाला आहे. बिपाशा-करण यांना मुलगी झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अनेक सेलेब्स आणि चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
प्रेग्नेंसीमध्ये बिपाशा फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माधय्मातून संवाद साधत होती. तिने आपल्या मॅटरनिटी पीरीयडमधील अनेक अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत होती. तिने प्रेग्नेंसी काळात अनेक ग्लॅमरस मॅटनरनिटी फोटोशूट केले होते.
बिपाशाच्या मॅटनरनिटी फोटोशूटचे फोटो अद्यापही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल आहेत. बिपाशा-करणचं लग्न २०१६ मध्ये झालं होतं. बिपाशाने ऑगस्टमध्ये एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यामातून प्रेग्नेंसीची गुड न्यूज शेअर केली होती.