धर्म योद्धा गरूड : मीर अलीचा धूर्त राक्षस महिषासूरच्‍या भूमिकेत प्रवेश | पुढारी

धर्म योद्धा गरूड : मीर अलीचा धूर्त राक्षस महिषासूरच्‍या भूमिकेत प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील मालिका ‘धर्म योद्धा गरूड’ने लक्षवेधी ठरत आहे. मालिकेमध्‍ये सध्‍या दुर्गा देवीचे नऊ अवतार आणि प्रत्‍येक शिकवणीचा गरूडच्‍या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडला हे पाहायला मिळत आहे. मागील एपिसोड्समध्‍ये आपल्‍याला पाहायला मिळाले की, पुराणामधील सर्वात शक्तिशाली असुर तारकासुराचा भगवान कार्तिकेयने वध केला. प्रेक्षकांना देवी दुर्गाची कथा पाहायला मिळेल, जिला महिषासुरमर्दिनी (महिषासुराचा संहार करणारी) देखील म्‍हणतात. महिषासुर ही पौराणिक भूमिका असून, धूर्त राक्षस म्‍हणून प्रचलित आहे, जो त्‍याचे शारीरिक रूप बदलत आपली दुष्‍ट ध्‍येये साध्‍य करतो. या एपिसोडमध्‍ये मीर अली महिषासुराची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

Dharm Yoddha Garud

या भूमिकेबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत मीर म्‍हणाला, “महिषासुर ही साकारण्‍यासाठी प्रबळ भूमिका आहे आणि कथानकामधील प्रमुख शत्रूंपैकी एक आहे. तो देवी दुर्गाच्‍या प्रवासामध्‍ये लक्षणीय भूमिका बजावतो. ज्‍यामुळे मला ही भूमिका साकारण्‍याचा आनंद होत आहे. मला महिषासुरच्‍या भूमिकेबाबत अधिक समजले तेव्‍हा मी ही भूमिका स्वीकारण्यासाठी होकार दिला. ही भूमिका मी यापूर्वी साकारलेल्‍या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे.’’

महान महिषासुराची भूमिका साकारण्‍यासाठी केलेल्‍या तयारीबाबत सांगताना तो म्‍हणाला, “आम्‍ही लुक टेस्‍ट करत असताना माझ्या मनात प्रथम शक्‍ती व रागाने भरलेल्‍या वेड्या बैलाच्‍या चित्राचा विचार आला. क्रिएटिव्‍ह टीम व दिग्‍दर्शकासोबत चर्चा करताना मी त्‍याबाबत सांगितले आणि आम्‍ही बैलाच्‍या काही वृत्ती व देहबोलींची भर केली.  एटिव्‍ह टीमने महिषासुराला प्रत्‍यक्षात आणण्‍यामध्‍ये अद्भुत भूमिका बजावली. आम्‍ही देहबोली, वाणी, आवाज व पोशाखावर काम केले. खासकरून मला मालिकेमधील माझा लुक खूप आवडला. पोस्‍ट-प्रॉडक्‍शनमध्‍ये घेतलेल्‍या मेहनतीनंतर माझा अंतिम लुक भयावह आणि बैलाचे व्‍यक्तिमत्त्व व शक्‍ती असलेल्‍या असुराला साजेसे होते.

मीरने भूमिकेमधील आव्‍हानाबाबत देखील सांगितले. तो म्‍हणाला, “ही भूमिका साकारणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक आहे. मी यापूर्वी असुरची भूमिका कधीच साकारलेली नाही. भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी माझ्या वास्‍तविक जीवनातील आवाजापेक्षा १००० पट अधिक मोठा आवाज असण्‍याची गरज होती. ते खूपच त्रासदायक आहे आणि मला विशाल राक्षसी हास्य सादर करण्‍याची खात्री घ्‍यावी लागत आहे, जे प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिलेले आहे. मला महिषासुराचा लुक देण्‍यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. हा बदल त्रासदायक असला तरी मी दिवसाच्‍या सुरूवातीपासून शेवटपर्यंत त्‍याचा आनंद घेतो.’’

Back to top button