मग माझा तणाव निघून गेला : अमला पॉल | पुढारी

मग माझा तणाव निघून गेला : अमला पॉल

सध्या तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अमला पॉल आता अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटात झळकणार आहे. अमलाने एका चित्रपटात दिलेल्या न्यूड सीनमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. ‘आडाई’ या तमिळ चित्रपटात तिने न्यूड सीन दिला होता. चित्रपटाचा ट ?ेलर जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या सीनबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, सीन चित्रीत करताना दिग्दर्शकाने मला खास पोशाख घालण्याचा सल्ला दिला होता. मी दिग्दर्शकाला काळजी करू नका, असे सांगितले. मला थोडा ताण वाटत आहे, पण एकदा हा ताण निघून गेला की सीन नीट चित्रीत करेन. मला फक्त याची चिंता होती की हा सीन चित्रीत करताना सेटवर नेमके कोण कोण असतील? सेटवर 15 जण उपस्थित होते जर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर कदाचित मी तो सीन चित्रीत केला नसता.

Back to top button