छोट्या आलियाला भेटण्यास करिना उत्सुक | पुढारी

छोट्या आलियाला भेटण्यास करिना उत्सुक

आलिया भट्टने रविवारी गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया-रणबीरला कन्यारत्न झाल्याने कपूर कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. छोट्या परीच्या आगमनासाठी कपूर कुटुंबीयही उत्सुक आहेत. रणबीरची बहीण करिना कपूरलाही भाचीला भेटण्याचा मोह अनावर होत आहे. आलिया आई झाल्याची गोड बातमी तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांना दिली. आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी. आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती खूप मनमोहक आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. आलियाच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंटस्चा वर्षाव करत आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या. या पोस्टवरील करिना कपूरची कमेंट चर्चेत आहे. करिनाने आलियाच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या गोंडस मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उफ माझी छोटी आलिया! तिला पाहण्यासाठी उत्सुक आहे, अशी कमेंट केली आहे.

Back to top button