रकुलप्रीत सिंगच्या मोहक आदांमुळे चाहते क्षणाक्षणाला घायाळ | पुढारी

रकुलप्रीत सिंगच्या मोहक आदांमुळे चाहते क्षणाक्षणाला घायाळ

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या लाजवाब अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सध्या अतिशय चर्चेत आहे. रकुल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.

रकुलकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. सध्या ती ‘थँक गॉड’ मध्ये वेगळीच भूमिका निभावत आहे. रकुलप्रीत लवकरच ‘छत्रीवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ही अभिनेत्री ‘आयलान’, ‘इंडियन 2’, ‘31 ऑक्टोबर लेडीज नाईट’ आणि ‘मेरी पटनी’ च्या हिंदी रिमेकमध्येही दिसेल.

चित्रपटसृष्टीत अत्यंत कमी वेळेत यशाचे शिखर गाठणार्‍या मोजक्या अभिनेत्रींमध्ये रकुलचा समावेश केला जातो. तिचा लूक आणि ड्रेस
सेन्सची नक्कल तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर करतात, हे नव्याने सांगायला नकोच.

Back to top button