36 Days : साठी शरीब हाश्‍मीसोबत अमृता खानविलकर करणार अभिनय

३६ डेज सीरीजमध्ये अमृता खानविलकर आणि शरीब हाश्‍मीची रोमांचक जोडी
Amruta Khanvilkar 36 Days series
अमृता खानविलकर पहिल्यांदाच शरीब हाश्मीसोबत काम करणारAmruta Khanvilkar Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी लिव्‍हची ओरिजिनल सिरीज '३६ डेज' १२ जुलै रोजी प्रसारित होणार असताना प्रेक्षकांमध्‍ये उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे. हा क्राईम थ्रिलर लबाडी, फसवणूक, प्रेम आणि कटकारस्‍थानांच्‍या चक्रव्‍यूहाच्‍या माध्यमातून रोलरकोस्‍टर राईडवर घेऊन जातो. यामध्‍ये अधिक उत्‍साहाची बाब म्‍हणजे या आगामी सिरीजमध्‍ये अमृता खानविलकर आणि शरीब हाश्‍मी पहिल्‍यांदाच पडद्यावर एकत्र येत आहेत. पण, रोचक बाब म्‍हणजे २०२१ पासून त्‍यांच्‍यामध्‍ये कनेक्‍शन आहे, जेथे अमृताने शरीबला त्‍याच्‍या पहिल्‍या ओटीटी पुरस्‍कारासह सन्‍मानित केले होते. आता, ही जोडी सिरीज '३६ डेज'मध्‍ये रील-लाइफ जोडपे म्‍हणून प्रेक्षकांचे मन जिंकण्‍यास सज्‍ज आहे.

Amruta Khanvilkar 36 Days series
रणबीरनंतर तृप्ती डिमरीने विकी कौशलसोबत दिले इंटिमेट सीन, जानम गाणं रिलीज
Summary

अमृता म्हणाली, ''आम्‍ही पहिल्‍यांदा ओटीटी ॲवॉर्ड्समध्‍ये एकमेकांना भेटलो आणि आमच्‍यामध्‍ये लगेचच मैत्री झाली. 'शरीबला त्‍याचा पहिला ओटीटी अवॉर्ड देण्‍याचा क्षण अभिमानास्‍पद होता. सीरीज '३६ डेज'मध्‍ये त्‍याच्‍यासोबत एकत्र काम करण्‍याचा अनुभव अविश्‍वसनीय आहे.''

अमृता खानविलकर म्हणाली...

सीरीजमध्‍ये आम्‍ही साकारत असलेल्या भूमिका ललिता व विनोद यांच्‍यामध्‍ये गुंतागुंतीचे व आगळे नाते आहे आणि त्‍याच्‍यासोबत या भूमिका साकारण्‍याचा अनुभव आव्‍हानात्‍मक व समाधानकारक आहे. तुमचा परफॉर्मन्‍स वाढवणारा सह-कलाकार मिळणे, सहसा घडत नाही, पण शरीबच्‍या बाबतीत अगदी तसेच घडले.

Amruta Khanvilkar 36 Days series
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत साकारणार खलनायिका

३६ डेजमध्‍ये शरिब हाश्‍मीची अशी असेल भूमिका

'३६ डेज'मध्‍ये शरिब हाश्‍मीने गोव्‍यामधील हॉटेल एमराल्‍ड ओशियन्‍स स्‍टार सूट्समधील जनरल मॅनेजर विनोद शिंदेची भूमिका साकारली आहे. विनोदची भूमिका सामान्‍य घरातील विनम्र सुरूवातीपासून आदरयुक्‍त पद मिळवण्‍यापर्यंत दाखवण्‍यात आली आहे, तसेच त्‍याला त्‍याच्‍या वैयक्तिक जीवनात, विशेषत: अमृता खानविलकर यांनी साकारलेली भूमिका त्‍याची पत्‍नी ललितासोबत आव्‍हानांचा सामना करावा लागतो. दुसरीकडे, ललिता ही गुंतागुंतीची भूमिका आहे, जिचा भूतकाळ गोंधळात टाकणारा आहे.

Amruta Khanvilkar 36 Days series
मराठी ओटीटीवर देशी-विदेशी चित्रपटांचा महाराष्ट्रीयन तडका

३६ डेज'मध्‍ये हेदेखील असणार कलाकार

'३६ डेज'मध्‍ये नेहा शर्मा, पुरब कोहली, सुशांबत दिवगीकर, श्रुती सेठ आणि चंदन रॉय सन्‍याल हे प्रतिभावान कलाकार देखील आहेत. गोव्‍यातील प्रसिद्ध उपनगरीय गृहनिर्माण इस्‍टेटच्‍या शांत पार्श्‍वभूमीवर आधारित ही सिरीज हत्‍येचा शोध घेण्यास सुरू होते. '३६ डेज'चा बहुप्रतीक्षित प्रीमियर १२ जुलै रोजी सोनी लिव्‍हवर पाहता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news