Kantara : ‘कांतारा’ने मोडला ‘केजीएफ’च्या कमाईचा विक्रम | पुढारी

Kantara : 'कांतारा'ने मोडला 'केजीएफ'च्या कमाईचा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवू लागला आहे. एकापाठोपाठ अनेक विक्रम चित्रपटाच्या नावावर जमा होऊ लागले आहेत. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने केजीएफचा विक्रम मोडीत काढला आहे. ‘कांतारा’ने केजीएफला मागे टाकत कमाईच्या बाबतीत जबरदस्त विक्रम केला आहे. त्यामुळे हा यशस्वी चित्रपट असल्याचे सिद्ध झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘कांतारा’  (Kantara)  हा कर्नाटकातील होंबळे प्रॉडक्शन हाऊसचा सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. फूटफॉलच्या बाबतीत कांताराने केजीएफला मागे टाकले आहे. KGF-1 च्या फुटफॉलचा आकडा 75 लाख होता. पण कांतारा च्या बाबतीत तो 77 लाखांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे हा सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे.

‘कांतारा’शी संलग्न त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 145 कोटी रुपये आहे. कांतारा हा कमी बजेटचा चित्रपट असून 15 ते 20 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. परंतु, कमाईचा विचार केल्यास चित्रपटाच्या खर्चाच्या जवळपास दहापट कमावले आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शन अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button