धार्मिक कंगना | पुढारी

धार्मिक कंगना

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने ‘कांतारा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे आणि लेखकाचे कौतुक केले आहे. आता ती चर्चेत आली आहे ते म्हणजे तिने आपल्या घरातील मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी कंगनाने क्रीम रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्यासमोर गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला झेंडूचा हार, फुले, प्रसाद असे पूजेचे साहित्य आहेत. पुरोहितांच्या मार्गदर्शनाने ती पूजा करत आहे. फोटोत ती ध्यान करताना दिसत आहे. तिने याला कॅप्शन दिले आहे… ‘या सणासुदीच्या काळात घरातील मंदिराचा जीर्णोद्धार केला’, असे तिने लिहिले आहे. कंगना गेली काही महिने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. यात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांच्यासह अभिनेत्री महिमा चौधरीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Back to top button