परिणिती चोप्रा म्हणते, माझ्यासाठी यशाचे मोजमाप म्हणजे... | पुढारी

परिणिती चोप्रा म्हणते, माझ्यासाठी यशाचे मोजमाप म्हणजे...

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘कोड नेम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. याआधी तिचे ‘साईना’, ‘नमस्ते इंग्लंड’, ‘जबरिया जोडी’ या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही.

नुकतीच तिने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या अपयशाबद्दल सांगितले आहे. ती असे म्हणाली की, माझ्यासाठी माझ्या यशाचे मोजमाप म्हणजे बॉक्स ऑफिसवरची कमाई नव्हे, तर प्रेक्षकांच्या येणार्‍या प्रतिक्रिया. तेवढ्याच माझ्यासाठी पुरेशा आहेत.

मला आयुष्यात पहिल्यांदाच अपयश पाहावे लागले. जागतिक स्तरावरही आपण अपयश पाहतो. माझ्या मते अपयश तुम्हाला खूप काही शिकवून जाते. मी आज आनंदी आहे ती यामुळेच. खरे सांगायचे, तर काही तरी वेगळे करून दाखवण्याच्या जिद्दीपायी मी ‘कोड नेम’ सारखा चित्रपट निवडला.

वाचा : 

Back to top button