

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) काहीही सोशल मीडियावर पोस्ट केले तर त्याची चर्चा होणार म्हणजे होणारच. शिवाय फक्त चर्चा होत नाही तर तिने केलेल्या पोस्टला क्रिकेटर ऋषभ पंत याच्याशी जोडले जाते. यानंतर उर्वशी रौतेलाला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जाते. ही आता प्रथाच पाडण्यात आली आहे. नुकताच उर्वशीने मंगळसूत्र आणि डोक्यात भांग भरलेला फोटो पोस्ट केला होता. शिवाय या फोटोसह तिने प्रेम आणि नात्यांवर काही लिहले होते. या गोष्टीला लोकांनी ऋषभ पंत यांच्याशी जोडले आणि पुन्हा उर्वशीवर सुरु केली ट्रोलधाड. पुन्हा आता असेच काहीसे घडले आहे, मात्र या वेळेला वेगळे प्रकरण आहे.
असेच काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती 'आय लव्ह यू' म्हणताना दिसली होती. पुन्हा लोकांनी याला ऋषभ पंतशी जोडले. यावेळी लोकांनी उठवले की, उर्वशी रौतेलाने या व्हिडिओच्या माध्यमातून ऋषभ पंतला प्रपोज केले आहे. पण, काय खरच उर्वशीने ऋषभला प्रपोज केले ? अखेर दोघांचे जे चाहते आहेत ते जो दावा करत आहेत तो खरा आहे ? आता या सर्वांवर उर्वशीनेच मौन सोडत उत्तर दिले आहे आणि तिने कोणाला 'आय लव्ह यू' म्हटले हे सुद्धा सांगितले आहे.
एक व्हिडिओ उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात ती म्हणाली होती, 'तुम्ही म्हणा आय लव्ह यू. नाही, पहिल्यांदा तुम्ही म्हणा आय लव्ह यू. पुन्हा एकदा म्हणा, बास आता आणखी एकदा म्हणून दाखवा'. उर्वशीने पोस्ट केलेला हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये वाऱ्यासारखा पसरला होता. या नंतर अनेक युजर्सनी उर्वशीला खरे खोटे बोल सुनावले होते. युजर्सच म्हणत होते की, जाणून बुजून उर्वशी असे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करुन ऋषभ पंत याचे लक्ष विचलीत करीत आहे. काही दिवसांपुर्वी भारतीय संघ विश्व चषक स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहचला. उर्वशीने सुद्धा ऑस्ट्रेलियाला पोहचली आणि तेथील फोटो शेअर केला. यानंतर चाहत्यांनी पुन्हा तिला ट्रोल केले.
या सर्व चर्चांना संपविण्यासाठी उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) आपले म्हणणे इंन्स्टाग्रामवर मांडले आहे. या पोस्टद्वारे तिने सांगितले की, 'सध्या माझा एक व्हिडिओ ज्यामध्ये मी आय लव्ह यू म्हटले आहे, तो सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो माझ्या अभिनयाच्या सरावाचा भाग होता. मी प्रत्यक्षपणे कोणालाही तसे म्हटले नाही, तसेच मी कोणालाही व्हिडिओ कॉल करुन देखील म्हटले नाही.' त्यामुळे आता तरी उर्वशीने 'आय लव्ह यू' म्हटलेला वाद आणि तो व्हायरल होणारा व्हिडिओ हे प्रकरण इथेच थांबते का ते पाहूया.
अधिक वाचा :