Esha Gupta : ईशानं बॉयफ्रेंडवर केला प्रेमाचा वर्षाव; मिरर सेल्फी व्हायरल

Esha Gupta
Esha Gupta

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) तिच्या बोल्ड, हॉट आणि ब्यूटिफूल लूकमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या एकापैक्षा एक हॉट फोटोंचा तडका चाहत्यांना पाहायला मिळतोय. याच दरम्यान ईशाने पुन्हा एकदा तिच्या प्रेमाची कबूली देत बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच काही मिनिटांत लाखांहून अधिक जणांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड मॅनुअल केंपस ग्वालर याच्यासोबतचा एक मिरर सेल्फी (फोटो) शेअर केला आहे. या वेळी ईशा टूपीसमध्ये असून तिने आकाशी रंगाच्या ब्रासोबत झिकझाक पॅन्ट परिधान केली आहे.  तिचा बॉयफ्रेंड मॅनुअलने ब्ल्यू रंगाच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसला आहे. यातील विशेष म्हणजे, ईशाच्या पाठीमागे मॅनुअल उभारलेला एकदम हॅडसम दिसतोय.  ईशाच्या हातात एक सेल फोन आहे. दोघांचा फोटो हा मिरर सेल्फी फोटो आहे.

या फोटोतून ईशा आणि मॅनुअलची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'better or worse ♥️'. असे लिहिले आहे. यावरून ईशाला चांगल्या आणि वाईट परिस्थितीत प्रेमाची व्यक्तीच मदतीला धावून येते असे म्हणायचं आहे. ईशाचा हा फोटो काही मिनिटांतच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात एका युजर्सने 'Blessings and love ?', '❤️Prettier every day', 'Amwmwm', 'Awesome', 'Damn it's hot???', 'Cute jodi ❤️', 'शुभकामनाएं???', 'So sad today?', '❤️??More likes❤️??', 'AWSM❤️❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news