पुढारी ऑनलाईन डेस्क : बेली डान्सर नोरा फतेही बॉलीवूडची प्रसिध्द डान्सर आहे. (Nora Fatehi ) आता ती एका कार्यक्रमामुळे चर्चेत आली आहे. नोरा अनेक फेस्टिवल्स आणि इवेंट्समध्ये परफॉर्म करते. नोराचा असाच एक कार्यक्रम बांगलादेशमध्ये होणार होता. पण, सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे नोराला कार्यक्रम करता येणार नाही. (Nora Fatehi )
नोरा बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एका इवेंटमध्ये परफॉर्म करणार होती; पण बांगलादेश सरकारने तिला या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली नाही. सरकारने परकीय चलन वाचवण्यासाठी असं केलं आहे .बांग्लादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी एक नोटिस जारी केली. यामध्ये नोरा फतेहीला जागतिक स्थिती पाहता आणि परकीय चलन साठा वाचवण्याच्या उद्देशाने परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.
नोराला वुमेन लीडरशिप कॉर्पोरेशन आयोजित एका कार्यक्रमात डान्स करण्यासाठी आणि पुरस्कार देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. नोरा फतेही सध्या एक डान्स शो जज करत आहे. याशिवाय ती अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत स्टारर चित्रपट थँक गॉडमध्येही दिसणार आहे. 'थँक गॉड'मध्ये नोरा फतेही 'मणिके' आयटम नंबर सॉन्गमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा सोबत थिरकणार आहे.
हेही वाचा :