Web Series XXX : सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारले; म्हणाले, ‘तरुणांचे मेंदू दुषित करते’ | पुढारी

Web Series XXX : सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारले; म्हणाले, ‘तरुणांचे मेंदू दुषित करते’

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड मधील प्रसिद्ध चित्रपट आणि टिव्ही मालिका निर्माता एकता कपूरला सर्वोच्च न्यायालायने शुक्रवारी (दि. १४) धारेवरधरत चांगलेच फटकारले. यावेळी आपल्या XXX सारख्या वेब सिरीजमधून अश्लील कंटेट दाखवून या देशातील तरुणांचे मेंदू दुषीत करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (Web Series XXX )

एकता कपूरच्या वेब सिरीज XXX विरोधात दाखल याचिकेच्या सुनावणी प्रकरणी न्यायालायाने चांगलेच ताशेरे ओढले. ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’ वर प्रक्षेपित होणारी वेब सिरीजमध्ये सैनिकांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट लागू करण्यात आला होता, त्याला देण्यात आलेल्या आव्हान याचिकेची सुनावणी शुक्रवारी पार पडली. (Web Series XXX )

न्यायाधीश अजय रस्तोगी आणि न्यायाधीश सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, “या बाबत काही तरी केले पाहिजे. तुम्ही या देशातील तरुण पिढीचे मेंदू दुषित करीत आहात. ते सर्वांना उपलब्ध आहे. OTT (ओव्हर द टॉप) वरील कंटेट सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कोणता पर्याय देत आहात?…उलट तुम्ही तरुणांची मने दूषित करत आहात.” (Web Series XXX )

यावेळी एकता कपूर यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण लवकरच सुनावणीसाठी सूचीबद्ध होईल अशी आशा नाही. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशाच एका प्रकरणात कपूर यांना संरक्षण दिले होते. (Web Series XXX )

यावेळी रोहतगी म्हणाले की, मालिकेतील कंटेट वर्गणीवर आधारित आहे आणि या देशात निवडीचे स्वातंत्र्य आहे. यावर न्यायालयाने विचारणा केली की, ‘तुम्ही जनतेला कोणता पर्याय दिला आहात, प्रत्येक वेळी तुम्ही या कोर्टात आला आहता, आम्ही त्याचे कौतुक करत नाही. अशी याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करू शकतो. मिस्टर रोहतगी कृपया तुम्ही तुमच्या क्लायंटला कळवा. फक्त तुम्ही एक चांगला वकील घेऊ शकता म्हणजे हे न्यायालय आवाज असलेल्यांसाठी आहे असे नाही.’ (Web Series XXX )

यावेळी कोर्ट म्हणाले की, ‘ज्यांना आवाज नाही त्यांच्यासाठी हे न्यायालय काम करते. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांच्या स्थितीचा विचार करा. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण प्रलंबित ठेवले आणि सुचवले की उच्च न्यायालयात सुनावणीची स्थिती जाणून घेण्यासाठी स्थानिक वकीलांची मदत घेतली जाऊ शकते.

बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयाने माजी सैनिक शंभू कुमार यांच्या तक्रारीवरून अटक वॉरंट बजावले होते. माजी सैनिक शंभू कुमार यांनी 2020 च्या तक्रारीत आरोप केला आहे की मालिका वेब सिरीज XXX च्या सीझन 2 मध्ये सैनिकाच्या पत्नीच्या बाबत अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती.


अधिक वाचा :

Back to top button