पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल ( Richa- Ali Fazal wedding) गेल्या दोन दिवसापूर्वीच लग्न बंधनात अडकले. कोरोनामुळे त्याचे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. यानंतर मुबंईत खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीला बालिवूडच्या अनेक मोठ- मोठ्या स्टार्संनी हजरी लावली होती. परंतु, यात खास करून बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लूकची जोरदार चर्चा झाली. ऋचा आणि अली फजल यांच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऋचा आणि अली फजल याच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून पसरल्या होत्या. गेल्या एप्रिल महिन्यात दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परतु, कोरोनाच्या संसर्गामुळे त्याचे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. प्रदिर्ध काळानंतर अखेर दोघांनी ५ ऑक्टोबरला लग्न केलं. या विवाह सोहळ्याला त्यांनी बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजरी लावली होती. परंतु, यात खास करून अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लूकने चारचॉद लावले.
या विवाहाला ऋतिक रोशन- सबा आझादसोबत सुजैन खान, तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी, तब्बू, विक्की कौशल, राजकुमार राव, पत्रलेखा, रेणुका शाहाणे, आशुतोष राणा, सान्या मल्होत्रा, कबीर खान, कीर्ती खरबंदा, तिचा बॉयफ्रेंड पुलकित सम्राट, वैभव रेखी, दिया मिर्झा, दिव्या दत्ता, मनोज वाजपेयी, तापसी पन्नू आणि शिखा तलसानिया याच्यासह जवळचे नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवरह व्हायरल झाले आहेत. या पार्टीत ऋचा प्रिन्टेड वनपीसमध्ये तर अली फजलने ब्ल्यू रंगाच्या सूटमध्ये एकदम हॅडसम दिसतोय.
हेही वाचलंत का?