काजोलच्या साधेपणाचे कौतुक (Video) | पुढारी

काजोलच्या साधेपणाचे कौतुक (Video)

सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे. चित्रपटविश्वातही या सणाला विशेष महत्त्व आहे. अनेक कलाकार देवीच्या दर्शनासाठी जात असतात. नुकतेच अभिनेत्री काजोल लालबाग येथील दुर्गादेवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली. यावेळी तिच्याबरोबर बहीण अभिनेत्री तनिषा होती. दर्शनावेळी दोघीही देवीच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून आले. काजोलच्या या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहते तिच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काजोलचा हा व्हिडीओ विरल भायानीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. देवीच्या दर्शनाला जाताना काजोलने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून पारंपरिक पद्धतीने ती तिथे वावरताना दिसतेय. यासोबत तिने कॅमेर्‍यासमोर पोझही दिल्या आहेत.

Back to top button