the immortal ashwatthama : बिग बजेट चित्रपटात विकी कौशलसोबत सामंथा दिसणार | पुढारी

the immortal ashwatthama : बिग बजेट चित्रपटात विकी कौशलसोबत सामंथा दिसणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विकी कौशल आणि आदित्य धर यांचे The Immortal Ashwatthama नावाच्या चित्रपटावर काम सुरू होते. पण, कोविडशी संबंधित काही कारणांमुळे हा बिग बजेट चित्रपट थांबवण्यात आला. आता हा चित्रपट पुन्हा सुरु होत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटातील कलाकार बदलण्यात आले आहेत. (the immortal ashwatthama)

ऑक्टोबर, २०२० मध्ये घोषणा झाली की, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ फेम आदित्य धर ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ नावाचा मायथोलॉजिकल सुपरहिरो चित्रपट केला जात आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान काम करणार होते. विकी आणि सारा चित्रपटामध्ये ॲक्शनसाठी इंटरनॅशनल टीमकडून ट्रेनिंग घेणं सुरु केलं होतं. दिग्दर्शक आदित्य धरने शूटिंग लोकेशनसाठी रेकीचं काम केलं होतं. रिसर्च मटीरियल तयार झाला होता. VFX टीमसोबत बैठकाही झाल्या होत्या. या सर्वांसाठी निर्माते रॉनी स्क्रूवालाने ३० कोटी रुपये खर्च केले होते. आता या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणे बाकी आहे.

कोविडच्या कळानंतर बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट आदळले. त्यामुळे निर्मात्यांना भीती होती की, त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट तोट्यात नये. कारण, ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ मोठ्या बजेटवर आधारित आहे. या चित्रपटातील कलाकार बदलण्यात आले आहेत.

‘द इमोर्टल अश्वत्थामा’ फर्स्ट पोस्टर 

एका रिपोर्टनुसार, ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ची निर्मिती रॉनी स्क्रूवाला ऐवजी जियो स्टुडिओज प्रोड्यूस करेल. चित्रपटातून सारा अली खान बाहेर झाली आहे. त्च्या जागी समांथा को कास्ट केलं होतं. आदित्य धरने या चित्रपटासाठी तीन वर्षे मेहनत घेतली आहे.

Back to top button