पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी ३६० डिग्री सेल्फी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. रविंद्र नाट्य मंदिर परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. या जनतेला मोफत ३६० डिग्री सेल्फी युनिट उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी नागरिकांचा प्रचंड भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेक कलावंत व गायक लोक रांगेत उभे राहून सेल्फी घेत होते. हे घेतलेले ३६० डिग्री सेल्फी समाज माध्यमात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये प्रसिद्ध गायक सोनु निगम, भावभक्ती गीत गायक अनुप जलोटा, युवा गायिका आर्या आंबेकर, गायिका वैशाली सामंत यांनी ३६० डिग्री सेल्फी घेतला. हे सेल्फी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
यावेळी सेल्फीसाठी सामान्य नागरिक तसेच कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. हा ३६० डिग्री सेल्फी नाविन्यपूर्ण उपक्रम सांस्कृतिक कार्य विभाग संचालक बिभीषण चवरे यांच्या संकल्पने अंतर्गत विविध अधिकारी यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. ३६० डिग्री सेल्फी युनिट सांगली येथील राहुल धनसरे आणि त्यांच्या सहकारी यांनी तयार केले होते. हे युनिट शासनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये उपलब्ध केला जातो.