ranbir kapoor : मला वडिलांसारखे बाबा व्हायचे नाही! | पुढारी

ranbir kapoor : मला वडिलांसारखे बाबा व्हायचे नाही!

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने बुधवारी वाढदिवस साजरा केला. लवकरच बाबा होणार्‍या रणबीरने त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. बाबा होणार असल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. रणबीर कपूर दिवगंत अभिनेते ऋषी कपूर यांचा मुलगा आहे. रणबीरने त्याचे वडील ऋषी कपूर यांच्याबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. माझ्या वडिलांसारखे बाबा होणे मला अजिबात आवडणार नसल्याचे रणबीर म्हणाला होता. मी जेव्हा लग्न करेन आणि माझ्या बाळाचा बाबा होईन, त्यावेळी माझ्या वडिलांसारखे होणे कदापि मला आवडणार नाही. मी सुरुवातीपासूनच माझ्या आईच्या जास्त जवळ राहिलो आहे. माझे वडील दिवसभर शूटिंगमध्ये व्यग्र असायचे. रात्री घरी आल्यावर त्यांना आम्हाला वेळ देणे शक्य नव्हते. मीदेखील सध्या चित्रपटात काम करतो. प्रत्येक वेळी माझे वडील माझ्याबरोबर खंबीरपणे उभे असतात. त्यांच्या चाहत्यांसाठी ते दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत. परंतु, ते अंतर्मुखी आहेत. त्यांच्या मनातील गोष्टी ते कधीच कोणाजवळही व्यक्त करत नसल्याचे रणबीर म्हणाला.

 

Back to top button