Deepika Padukone : दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल | पुढारी

Deepika Padukone : दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमधील सध्याची सर्वात आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणबाबत (Deepika Padukone) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची तब्येत बिघडल्यानं तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दीपिकाला 26 सप्टेंबरला रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपिकाला अचानक अस्वस्थ लाटू लागल्याने तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोणला अस्वस्थ जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिला खूप त्रास होत असल्याच्या कारणाने ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी तिच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. दीपिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर जवळपास 12 तासांचा अवधी लागला. काही चेकअप्स केल्यानंतर डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. तिच्या प्रकृतीची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हैदराबादमधल्या कामिनेनी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दीपिकाला दाखल करण्यात आले होते. शूटिंगदरम्यान हृदयाचे ठोके वाढल्यानंतर दीपिकाला (Deepika Padukone) अस्वस्थतेमुळे तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. यादरम्यान ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत चित्रपटाची शूटिंग तयारी सुरू होती. काही तासांच्या चेकअपनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला होता.

दीपिकावर सातत्याने कामाचा लोड होत असल्याने त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होत असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर ती युरोप दौऱ्यावर गेली होती. युरोपहून परतल्यानंतर तिने प्रभाससोबत शूटिंगला सुरुवात केली. कामाचा वर्कलोड वेळापत्रकामुळे तिच्या रक्तदाबावर परिणाम झाला आहे, अशी माहिती निर्माती अश्विनी दत्त यांनी दिली.

Back to top button