Kriti Sanon : क्रिती सेनॉन करतेय 'बाहुबली' ला डेट? | पुढारी

Kriti Sanon : क्रिती सेनॉन करतेय 'बाहुबली' ला डेट?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची सर्वात बोल्ड अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. बाहुबली फेम आणि साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) ला क्रिती डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली आहे. परंतु, दोघांन्हीही याबाबतचा अधिकृत खुलासा केलेला नाही.

साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांनी आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे शुंटिंग नुकतेच संपवले आहे. यानंतर हे कपल अनेक ठिकाणी स्पॉट झाले आहे. दरम्यान अजूनही हे कपल एकमेंकाच्याबद्दल आदराने बोलताना दिसतात. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री रंजक दर्शविण्यात आली आहे. या सगळ्यावरून सोशल मीडियावरील चाहत्यांनी क्रिती सेनॉन प्रभासला डेट करत असल्याचे म्हटलं आहे. यामुळे सोशल मीडियात प्रभास आणि क्रितीची जोडीच्या रिलेशनशिपची चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, याच दरम्यान प्रभास किंवा क्रिती यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

क्रिती आणि प्रभास हे दोघेही सध्या सिंगल असून आपापल्या कामात बिझी आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनॉनसोबत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, सनी सिंह आणि वत्सल सेठ यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट हिंदीसह तेलुगु, मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

बाहुबली प्रभास हिन्दी लिखते और पढ़ते हैं - BBC News हिंदी

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

Back to top button