आर्यन खान पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमात! | पुढारी

आर्यन खान पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमात!

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडचा किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सध्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. तो आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमात पडला असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

आर्यन खानने नुकतेच ‘आदिदास’ या मोठ्या कंपनीसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधले काही फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एका पाकिस्तानी अभिनेत्रीने आर्यन खानबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘सजल अली’ असे तिचे नाव आहे. फवाद खानच्या ‘बेहद’मध्ये सजल अलीने भूमिका साकारली होती. यामध्ये ती आईच्या प्रियकराच्या प्रेमात पडते. सजलने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आर्यन खानचा फोटो पोस्ट केला आहे.

यासोबतच तिने शाहरूख खानच्या चित्रपटातील ‘हवाये’ गाण्याची पार्श्वभूमी मांडली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे? सजलने करिअरची सुरुवात 2009 साली पाकिस्तानी टी.व्ही. विश्वातून केली होती. करिअरमध्ये तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. सजलने मॉम या बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ती श्रीदेवीच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती.

Back to top button