ए. आर. रहमान यांनी जिंकली चाहत्यांची मने | पुढारी

ए. आर. रहमान यांनी जिंकली चाहत्यांची मने

पुढारी ऑनलाईन : ए. आर. रहमान हे संगीत क्षेत्रातील दिग्गज नाव आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. रेहमान यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला असून त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

मलेशियातील ए.आर. रहमान कॉन्सर्टची मलेशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सुमारे 10 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवरून त्यांनी आपल्या मैफलीची घोषणा केली आहे. डीएमवायचे प्रॉडक्शन चेअरमन दातो मोहम्मद युसूफ यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह हेलिकॉप्टरमधून रहमानच्या मलेशियातील मैफलीची घोषणा केली.

रहमाननेही हा खास क्षण त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी ट्विटरवर त्यांचे सहकारी ध्वजासह उडी मारतानाची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत, मलेशिया..आर..यू रेडी ? असे कॅप्शन दिले आहे. क्वालालंपूर येथील नॅशनल स्टेडियम बुकित जलील येथे होणार्‍या या कार्यक्रमाला ‘ए.आर. रहमान – सिक्रेट ऑफ सक्सेस’ असे नाव देण्यात आले आहे.

Back to top button