

पुढारी ऑनलाईन : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांचा ब्रह्मास्त्र चित्रपटही प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने देशात आणि जगात चांगलीच कमाई केली आहे. नुकताच हा आनंदाचा प्रसंग साजरा करताना आलिया भट्टने तिच्या इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. आलियाचा रणबीर कपूरसोबतचा हा रोमँटिक फोटो (Alia Romantic Photo) शेअर होताच ताे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
आलिया भट्टने तिच्या इन्स्टा हँडलवर पती रणबीर कपूरसोबतचा एक रोमँटिक फोटो (Alia Romantic Photo) शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. हा फोटो ब्ल्रॅक अँड व्हाइट असून रणबीर आलियासोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. दोघांमधील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. (Alia Romantic Photo)
हा फोटो शेअर होताच चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. कमेंट करताना एका चाहत्याने "तुम्ही दोघं किती क्यूट दिसत आहात" तर आणखी एका चाहत्याने कमेंटमध्ये "जोडी असावी तर अशी", असे म्हटलं आहे.