Chandigarh University : धक्कादायक! होस्टेलमधील 60 मुलींचा आंघोळ करतानाचा MMS व्हायरल! चंदीगड विद्यापीठात मोठा गोंधळ | पुढारी

Chandigarh University : धक्कादायक! होस्टेलमधील 60 मुलींचा आंघोळ करतानाचा MMS व्हायरल! चंदीगड विद्यापीठात मोठा गोंधळ

पुढारी ऑनलाईन डेस्क :  चंदीगड विद्यापीठातून एक धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहात (Chandigarh University ) जवळपास 60 मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून एका विद्यार्थीनीने इंटरनेटवर अपलोड व्हायरल केलाचे उघडकीस आले आहे. हा प्रकार विद्यार्थींनींच्या लक्षात येताच आठ मुलींनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीला ताब्यात घेतले आहे.

Chandigarh University : व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड 

माहितीनुसार, एका विद्यार्थीनीने चंदीगड वसतिगृहातील मुलींचे आंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते व्हायरल केले आहेत. ही विद्यार्थीनीही वसतिगृहात राहते. यातील काही व्हिडिओ तिने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने इंटरनेटवर अपलोड केले आहेत. यातील काही व्हिडिओ जेव्हा संबधित मुलींपर्यंत गेले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्ररकरणा मुळे संबधित मुलींपैकी आठ मुलींनी स्वत:ला इजा करुन घेण्याचा प्रयत्न केला. यातील एक मुलगी गंभीर आहे.

वृत्तानुसार, हा प्रकार विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थींनीनी विद्यापाठासमोर (Chandigarh University) घोषणाबाजी सुरु केली. संतप्त विद्यार्थ्यांकडून आणखी काही हानिकारक घटना टाळण्यासाठी, विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी कॅम्पसचे दरवाजे बंद केले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी पीसीआर वाहनेही उलटवली परिणामी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

Chandigarh University : ही बाब गंभीर – मनीषा गुलाटी

पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी माध्यमांना सांगितले ही बाब गंभीर असून, तपास सुरू आहे. मी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आश्वासन देते की, आरोपींना शिक्षा केली जाईल. तर एसएसपी मोहाली विवेक सोनी म्हणाले संबधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेशी संबंधित मृत्यूची नोंद नाही. वैद्यकीय नोंदीनुसार, कोणताही प्रयत्न (आयुष्य संपवण्याचा) नोंदवलेला नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button