‘अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल’मध्‍ये मरियम गुलाम व्‍यापाऱ्यांपासून स्‍वत:चे रक्षण कसे करणार? | पुढारी

‘अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल’मध्‍ये मरियम गुलाम व्‍यापाऱ्यांपासून स्‍वत:चे रक्षण कसे करणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल’ प्रत्‍येक नवीन उलगड्यासह रोमांचक ट्विस्‍ट्स सादर करत आहे. आगामी एपिसोडमध्‍ये शेहजादी मरियम जमालखानामध्‍ये अडकते. अलिबाबा व त्‍याच्‍या मुलांच्या काहीशा मदतीने गुलाम व्‍यापाऱ्यांमधून स्‍वत:ची सुटका करून घेण्‍याच्‍या आशेसह मरियम स्थिती स्‍वत: हाताळण्यास पुढाकार घेते.

एकीकडे अली जमालखानामध्‍ये सुल्‍तानच्‍या आत्‍म्‍यासाठी प्रार्थना करतो आणि दुसरीकडे मरियमला सुदैवाने अली व मुलांच्या रूपात काही मदत मिळते, ज्‍यामुळे तिला सुटका करून घेण्‍याचा आशेचा किरण दिसतो. अलीची मुले नकळतपणे मरियमचे गुलाम व्‍यापाऱ्यांपासून संरक्षण करतात, तर ती पुरुषाचे रूप घेत त्‍यांना मूर्ख बनवते. मरियमने तिच्‍या जीवनातील नवीन समस्‍यांचे स्‍वत:हून निराकरण करण्‍यास पुढाकार घेतला असल्‍यामुळे पहिल्‍यांदाच अली आणि जोरावरची टोळी धमकी देणाऱ्या व्यापाऱ्यांना दूर करण्यासाठी एकत्र येणार आहे.

भल्‍यासाठी मरियमची गुलाम व्‍यापाऱ्यांच्‍या तावडीतून सुटका होईल का? की तिच्‍या नशीबात असलेल्‍या आणखी समस्‍यांची ही सुरूवात आहे? मरियमची भूमिका साकारणारी तुनिषा शर्मा म्‍हणाली, ”सुरू असलेल्‍या एपिसोडमधील मला आवडलेली बाब म्‍हणजे मुले मरियमला वाचवतात, जी जमालखानामध्‍ये पुरूषाच्‍या वेषात असते. अलीचे शौर्य आणि मरियमचे धाडस सिद्ध करते की ते एकमेकांसाठी बनले आहेत. मरियम दुष्‍टाच्‍या तावडीमध्‍ये स्‍वत:चे रक्षण कशाप्रकारे करते हे पाहण्‍यासाठी मी स्‍वत: खूप उत्सुक आहे.”

हेही वाचा :

Back to top button