भोसरी, वाकडमध्ये दोन चोरीच्या घटना | पुढारी

भोसरी, वाकडमध्ये दोन चोरीच्या घटना

पिंपरी : एमआयडीसी भोसरी आणि वाकड परिसरात चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सचिन कांतिलाल रणपिसे (30, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी इंडस्ट्रियल मिनरल्स अँड रिफॅक्टरीज कंपनी या कंपनीच्या गेटसमोर मंगळवारी रात्री नऊ वाजता पार्क केली. अवघ्या अर्ध्या तासात त्यांची दुचाकी चोरीला गेली. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

प्रवीणकुमार कृष्णा कांबळे (38, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर मंगळवारी (दि. 6) दुपारी अडीच ते गुरुवारी (दि. 6) सायंकाळी साडेपाचच्या कालावधीत कुलूप बंद होते. दरम्यान, चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातून 32 हजार 600 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button