Amruta Khanvilkar : ओके मध्ये आहे सर्व 🔥; चंद्रा बनली ब्लॅक ब्यूटीडॅशिंग | पुढारी

Amruta Khanvilkar : ओके मध्ये आहे सर्व 🔥; चंद्रा बनली ब्लॅक ब्यूटीडॅशिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) तिच्या चंद्रमुखी चित्रपटातील भूमिकेने खूपच चर्चेत आली. या चित्रपटातील तिच्या नृत्‍याला चाहत्यांनी अगदी डोक्यावर उंचलून घेतले होते. आता मोठ्या पडद्यावरील दमदार भूमिकेनंतर तिने आपल्या मोर्चा छोट्या पडद्याकडे वळविला आहे. अमृता नुकतेच इतर स्पर्धकांना कडी टक्कर देत ‘झलक दिखला जा १०’ या शोमध्ये धमाकेदार डान्सचा जलवा दाखविला. यानंतर तिने परिधान केलेल्या ब्लॅक कपड्याची जोरदार चर्चा होवू लागली आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) ने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा १०’ या शोमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटो पाहून चाहत्यांनी तिला’ ब्लॅक ब्यूटी’ असे म्हटलं आहे. यावेळी परफॉर्म करताना पूर्ण ब्लॅक ड्रेसमध्ये असून तिच्या ड्रेसवर भरगच्च प्लॅटिनम ज्वेलरी दिसतेय. केसांची स्टाईल, गुलाबी लिपस्टिक, हाय हिल्स आणि मेकअरने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे.

यातील खास म्हणजे, अमृताने पहिल्यांदा चार इंचाच्या हाय हिल्स घालून डान्स केला. यासोबतच तिच्या ड्रेसवह भरपूर अशा प्लेटिनमच्या साखळ्या दिसतात. या फोटोत अमृताचा एकदम डॅशिग लूक पाहायला मिळतोय.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘Beautiful❤️’, ‘So stunning ❤️’, ‘So sweet ❤️’, ‘Amazing ❤️🔥’, ‘Ok madhi aahe sarav❤️🔥’, ‘Nice looooooooook’, ‘सुंदर अदा’, ‘nice pose..🔥Ufffff 🔥🔥🔥’, ‘Amazing performance 😍’, ‘Awesome, Nice pic❤️’, ‘Uffff mam you looking so hottt🔥🔥’, ‘Hottest, Hot 🔥🔥’, ‘Super cute ❤️’, ‘Gorgeous ❤️❤️’, ‘Wow so nice pose😍’, ‘Stunning 🔥🔥’, ‘Osm🔥😍’, ‘Superb 🔥’, ‘Gorgeous 🖤’. ‘सौ दिल अगर हमारे होते, खुदा कसम, सब के सब तुम्हारे होते❣️’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि ब्लॅक रंगाचे फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

या फोटोला आतापर्यत जवळपास २६ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. अमृता नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ‘झलक दिखला जा १०’ या शोला बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही, करण जोहर आणि माधुरी दीक्षित जज करत आहेत. मनीष पॉल हा शो होस्ट करत आहे. शोच्या दुसऱ्या आठवड्यात स्पर्धक एकमेकांना तगडी स्पर्धा देत आहेत. याच दरम्यान अमृताने परफॉर्म केला आहे.

हेही वाचलंत का?

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

Back to top button