Mitali Mayekar Birthday : तुझे हास्य आणि आनंद… असं म्हणत सिद्धार्थची खास पोस्ट

Mitali Mayekar Birthday :
Mitali Mayekar Birthday :
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! फेम सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर याच्या नव्या घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे. यानंतर त्यांनी नव्या घरात गणपती बाप्पाच्या आगमनाने नवे चैतन्य फुलवले. तर सिद्धार्थ आणि मिताली दोघेजण नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. मिताली मयेकरचा आज वाढदिवस ( Mitali Mayekar Birthday ) असल्याने तिच्यासाठी एक खास पोस्ट सिद्धार्थने लिहिली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात क्युट कपल म्हणून सिद्धार्थ -मितालीला ओळखले जाते. नुकतेच त्यांनी गणेशोत्सोव मोठ्या उत्साहात साजरा केलाय. याच दरम्यान आज मिताली मयेकरचा वाढदिवस ( Mitali Mayekar Birthday ) आहे. या खास निमित्ताने पती सिद्धार्थ चांदेकरने तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या दरम्यान अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मितालीसोबतचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत सिद्धार्थ -मिताली दोघेजण एकमेकांच्या जवळ उभे असून मितालाने सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवल्याय. शेअर झालेल्या दुसऱ्या फोटोत मिताली केक कपताना दिसतेय.

मितालीने आकाशी- व्हाईट रंगाच्या टिशर्ट आणि सिद्धार्थने रंगीबेरंगी फुलांचा शर्ट परिधान केल्याय. कॅप्शनमध्ये सिद्धार्थने 'वाढदिवसाच्या खूपसाऱ्या हार्दिक शुभेच्छा पत्नी.? तुझे हास्य आणि आनंद मला हवं आहे. माझ्याकडे एवढेच आहे❤️.' असे लिहिले आहे. तर त्याने #tinypanda #happy birthdaywifey असे हॅशटॅगदेखील दिले आहेत. यानंतर मितालीनेही या फोटोला रिट्विट करत 'आय लव्ह यू, आय मिस यु ??.' असे म्हटलं आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह मराठी कलाकारांनी भरभरून वाढदिवसाच्या तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यात मराठी कलाकार अभिजित चांदेकरने तीन हार्ट रेड ईमोजी शेअर कले आहेत. तर प्रसाद ओक आणि मंजिरी ओकसह अनेकांनी फोटोला प्रतिक्रिया देताना शुभेच्छाचा वर्षाव केलाय. आतापर्यत या फोटोला १४ हजांराहून अधिक जाणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news