Prajakta Mali : ‘बोले तो आपला माणूस भिडू’, जॅकी श्रॉफ-प्राजक्ताचे ‘वर्षा’वर सहभोजन

जॅकी श्रॉफ-प्राजक्ता
जॅकी श्रॉफ-प्राजक्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाऊ कदम, श्रेया बुगडे, जॅकी श्रॉफ, प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्यासह अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांनी वर्षा बंगल्यावर भेट दिली. यावेळी या कलाकारांनी वर्षा येथे जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सहभोजनाचा आनंदही घेतला. खास म्हणजे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इन्स्टाग्रामवर त्याबद्दलची एक पोस्ट लिहिलीय. या पोस्टसोबतचं तिने काही फोटो शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये ती जॅकी दादा अर्थातच प्रसिध्द बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबत दिसतेय. (Prajakta Mali)

प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलंय- "वर्षा" बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं… अर्थातच, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे… परवा मुख्यमंत्री कार्यालयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला वर्षावर यायला जमेल का? असा फोन आल्यावर खूप आनंद झाला… ? . आम्हासारख्या कलाकारांना घरी बोलावून मान दिल्याबद्दल व आदरातिथ्य केल्याबद्ददल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, मा. श्रीकांतजी शिंदे सरांचे व परिवाराचे मनापासून आभार… जॅकी दादांबरोबरचे क्षण म्हणजे cherry on the cake ♥️… .#lovedthegesture #gratitude #वर्षाबंगला #मुंबई.

जॅकी श्रॉफ-प्राजक्ता
जॅकी श्रॉफ-प्राजक्ता

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसते. सोबतच कॉमेडियन नम्रता संभेरावदेखील दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये ती जॉकी श्रॉफ यांच्यासोबत भोजन करताना दिसते. तिने जॉकी यांच्यासोबत दोन फोटो शेअर केले आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये ती जॅकी यांच्यासोबत बोलताना दिसते.

प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम हँडलचा कमेंट्स बॉक्स भरून निघालाय. तिचं चाहत्यांनी कौतुक तर केलं आहेच, शिवाय ती किती सुंदर दिसतेय? याविषयी कमेंट देखील केल्या आहेत. नेटकर्यांनी म्हटलं आहे-Khupch bhari Yaar ❤️??, Praju Khup Sundar disat aahes❤️❤️❤️, तुमचा भाग्योदय खूप जोरात चालू आहे…nttu?❤️, खूपच छान गणपती बाप्पा मोरया, Great❤️, Areyyyar wahhh praju ❤️❤️, Jaki dada ?? love u, मुख्यमंत्री प्रत्येकाला आपला वाटणारा ❤️, वाह प्राजु कृपया राजकारणात सामील व्हा, तुला राजकारणी म्हणून पाहण्याचे माझे स्वप्न आहे, Majja ahe eka porichi?.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news